Top 25 Marathi Serials to Watch

Top 25 Marathi Serials to Watch

१. सरस्वती

Saraswati Marathi Serial
Saraswati

सरस्वती हि सिरीयल कलर्स मराठी चॅनेल वर सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता प्रसारित होते. हि सिरीयल राघव भैरवकर आणि सरस्वती या दोंघांवर आधारित आहे. राघव हा गावचा सगळ्यात श्रीमंत आणि प्रतिष्टीत पुरुष आहे आणि एके बाजूला सरस्वती हि सर्व सामान्य घरातील मुलगी आहे. सरस्वती आणि राघव मध्ये प्रेम कसे होते आणि सरस्वतीला किती गोष्टीना सामोरे जावे लागते हे पाहण्यासाठी तुम्हाला हि सिरीयल पाहावी लागलं.

पात्र

तितिक्षा तावडे – सरस्वती
अस्ताद काळे – राघव भैरवकर
शेखर फडके – कान्हा (राघवाचा लहान भाऊ)

Watch Saraswati On Voot.com

२. तुझ्यात जीव रंगला

Tuzyat Jiv Rangala Marathi Serial
Tuzyat Jiv Rangala

तुझ्यात जीव रंगला हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ७.३० वाजता प्रसारित होते. हि सिरीयल राणा आणि अंजली या दोघांवर आधारित आहे. राणा हा नामांकित पैलवान आणि सुधारित शेतकरी आहे आणि अंजली हि त्याच गावातील एक शिक्षिका आहे. राणा हा अंजलीवर एकतर्फे प्रेम करतो पण तो स्त्रियांशी बोलण्यास खूप लाजतो. हि प्रेम कहाणी कशी वाढते आणि राणा अंजलीला कसे प्राप्त करतो हे पाहण्यासाठी नक्की पहा तुझ्यात जीव रंगला.

पात्र

हार्दिक जोशी – राणा
अक्षया देवधर – अंजली

Watch Tuzyat Jiv Rangala

३. का रे दुरावा

Ka Re Durava Marathi Serial
Ka Re Durava

का रे दुरावा हि सिरीयल जय आणि अदिती या दोघांवर आधारित आहे. जय हा एक सामान्य मुलगा आहे आणि अदिती हि श्रीमंत घरातील मुलगी आहे. ते दोघे नवरा बायको आहेत. ते दोघे एकाच ऑफिस मध्ये काम करतात पण ते सांगू नाही शकत कि त्यांचे लग्न झाले आहे म्हणून. पुढे त्या दोघांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग पाहण्यासाठी नक्की पहा का रे दुरावा

पात्र

सुयश टिळक- जय
सुरुची अदरकर- अदिती

Watch Ka Re Durava On Ozee.com

४. जुळून येति रेशीमगाठी

Julun Yrti Reshimgathi Marathi Serial
Julun Yrti Reshimgathi

जुळून येति रेशीमगाठी हि सिरीयल आदित्य आणि मेघना या दोघांवर आधारित आहे. आदित्य आणि मेघनाचं लग्न झाले आहे. आदित्य हा मेघनावर एकतर्फे प्रेम करतो पण मेघनाचं लग्नाआधीपासून दुसऱ्यावर प्रेम आहे . आदित्य मेघनाला कसे प्राप्त करतो आणि मेघना कश्यामुळे आदित्यच्या प्रेमात पडते हे पाहण्यासाठी नक्की पहा जुळून येति रेशीमगाठी.

पात्र

ललित प्रभाकर- आदित्य
प्राजक्ता माळी- मेघना

Watch Julun Yeti Reshimgathi On ozee.com

५. १०० डे

100 Day Marathi Serial
 

१०० डे हि सिरीयल अजय ठाकूर आणि राणी  सरदेसाई या दोघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये अजय ठाकूर हा एक सिन्सिअर पोलीस इन्स्पेक्टर आहे. आणि राणी सरदेसाई हि एक खुनी किंवा नजरेने मोठ्या मोठ्या माणसांना तिच्या जाळ्यात कसे फसवते हे या सिरीयल मध्ये पाहायला मिळेल. अजय ठाकूर आणि राणी सरदेसाई या दोघातील संबंध कसे आहेत. हेच पाहण्यासाठी नक्की पहा नजरेच्या जाळ्यात गुंतवणारे १०० डे

पात्र

आदिनाथ कोठारे- अजय ठाकूर
तेजस्विनी पंडित- राणी सरदेसाई

Watch 100 Day On ozee.com

६. नांदा सौख्य भरे

Nanda Saukhya Bhare Marathi Serial
Nanda Saukhya Bhare

नांदा सौख्य भरे हि सिरीयल निल आणि स्वानंदी या दोघांवर आधारित आहे. निल हा मोठ्या घरातील मुलगा आहे आणि स्वानंदी हि सामान्य घरातील मुलगी आहे. त्या दोघांच्या लग्नानंतरच्या आयुष्यावर आधारित हि सिरीयल आहे.
आणि त्यांना एकमेकांपासून वेगळं कसे करता येईल यासाठी निलची आई करणारे प्रयत्न.हे पाहण्यासाठी पहा नांदा सौख्य भरे.

पात्र

ऋतुजा बागवे- स्वानंदी
चिन्मय उदगीरकर- निल

Watch Nanda Saukhya Bhare On ozee.com

७. जय मल्हार

Jay Malhar Marathi Serial
Jay Malhar

जय मल्हार हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ६.३० वाजता प्रसारित होते. हि सिरीयल म्हणजे महादेवाचा मार्तंड भैरवाचा अवतार म्हणजेच खंडोबा.तर पार्वतीच्या अवतारात म्हाळसा आणि जयाद्रीच्या अवतारात बानू या तिघांवर आधारित आहे. म्हाळसा हि खंडोबाची पहिली पत्नी आहे.तर बानूची भक्ती आणि खंडोबाचा बानूशी झालेला प्रेमविवाह आणि म्हाळसाचे खंडोबावरील प्रेम हे पाहण्यासाठी नक्की पहा जय मल्हार

पात्र

देवदत्त नागे- खंडोबा
सुरभी हांडे- म्हाळसा
इशा केसकर- बानू

Watch Jay Malhar On ozee.com

८. काहे दिया परदेस

Kahe Diya Parades Marathi Serial
Kahe Diya Parades

काहे दिया परदेस हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होते. हि सिरीयल
शिव आणि गौरी या दोघांवर आधारित आहे. हि सिरीयल परंपरा, संस्कार रीती-रिवाज यावर आधारित आहे. शिव हा बनारसचा आहे तर गौरी हि मुंबईची राहणारी मुलगी आहे. शिव आणि गौरीची प्रेम कहाणी कशी सुरु झाली आणि त्यांच्या लग्नानंतर गौरीला कोणकोणत्या गोष्टीना सामोरे जावे लागते हे पाहण्यासाठी तुम्हाला काहे दिया परदेस हि सिरीयल पाहावी लागलं.

पात्र

ऋषी सक्सेना- शिव
सायली संजीव- गौरी

Watch Kahe Diya Pardes On ozee.com

९. होणार सून मी या घरची

Honar Sun Mi Ya Gharchi Marathi Serial
Honar Sun Mi Ya Gharchi

होणार सून मी या घरची हि सिरीयल श्री आणि जानव्ही या दोघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये श्रीला त्याची आई धरून पाच चुलत्या आहेत आणि त्या सगळ्या श्रीला त्यांचा मुलगाच मानतात. श्री आणि जानव्हीचे एकमेकांवर प्रेम असते. जानव्हीचे श्री बरोबर लग्न झाल्यावर ती त्या घरात कशी राहते. तिला येणाऱ्या अडचणी. त्या अडचणींना ती कशी सामोरे जाते हे सगळे ट्विस्ट पाहण्यासाठी नक्की पहा होणार सून मी या घरची….

पात्र

शशांक केतकर- श्री
तेजश्री प्रधान- जानव्ही

Watch Honar Sun Mi Ya Gharchi On ozee.com

१०. पुढचं पाऊल

Pudhach Paaul Marathi Serial
Pudhach Paaul

पुढचं पाऊल हि सिरीयल अक्कासाहेब सरदेशमुख आणि कल्याणी सरदेशमुख या दोघीवर आधारित आहे.
या सिरीयल मध्ये अक्कासाहेब हि घरातील प्रमुख आहे. ती म्हणेल तीच पूर्व दिशा आणि कल्याणी हि तिची सून आहे. कल्याणीच्या स्वभाव खूप प्रेमळ आहे. त्यामुळे तिला होणाऱ्या अडचणी आणि अक्कासाहेबांच्या आज्ञा या सगळ्याना कल्याणी कशी सामोरी जाते हे पाहण्यासाठी तुम्हाला पुढचं पाऊल हि सिरीयल पाहावी लागेल ……..

पात्र

हर्षदा खानविलकर- अक्कासाहेब
जुई गडकरी- कल्याणी

Watch Pudhach Paaul On Hotstar.com

११. देवयानी

Devayani Marathi Serial
Devayani

देवयानी हि सिरीयल संग्राम आणि देवयानी या दोघांवर आधारित आहे. संग्राम हा पाटील घरान्यातील  मुलगा आहे आणि देवयानी हि सामान्य घरातील  मुलगी. या सिरीयल मध्ये संग्राम देवयानीवर  एकतर्फे प्रेम करतो आणि जबरदस्तीने संग्रामने देवयानी सोबत लग्न केले. संग्राम आणि देवयानीच्या लग्नानंतर देवयानीला आलेल्या अडचणी आणि ती काश्यामुळे संग्रामच्या प्रेमात पडली हे पाहण्यासाठी नक्की पहा देवयानी……

पात्र

संग्राम साळवी- संग्राम
शिवानी सुर्वे- देवयानी

Watch Devayani On Hotstar.com

१२. नकटीच्या लग्नाला यायचं हं

Nakatichya Lagnala Yaych H Marathi Serial
Nakatichya Lagnala Yaych H

नकटीच्या लग्नाला यायचं हं हि नवीन सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारी होते.
या सिरियलच्या नावावरूनच असं लक्ष्यात येत कि लग्नाच्या उंबरठ्यावर उभी असलेल्या एका तरुण मुलीच्या विश्वाभोवती फिरणारी हि सिरीयल आहे. हि सिरीयल नकटीच्या लग्नावर आधारित आहे. या सिरीयल मधील  कॉमेडी आणि धमाल पाहण्यासाठी नक्की पहा नकटीच्या लग्नाला यायचं हं…

पात्र

प्राजक्ता माळी- नपुर (नाकटी)

Watch Naktichya Lagnala Yaych Ha On Ozee.com 

१३. चाहूल

Chahul Marathi Serial
Chahul

चाहूल हि नवीन सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर प्रसारित होते. हि एक हॉरर सिरीयल आहे. हि सिरीयल
सर्जेराव,जेनी आणि निर्मला या तिघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये सतत अनपेक्षित अशी असणारी एक चाहूल अशी हि सिरीयल आहे. या सिरीयल मध्ये निर्मलाची डेथ दाखवली आहे आणि तिची चाहूल हि कशी अनपेक्षित आहे हे पाहण्यासाठी नक्की पहा चाहूल

पात्र

अक्षर कोठारी- सर्जेराव
लीझन- जेनी(रशियन ऍक्टर)
शाश्वती पिंपळीकर- निर्मला

Watch Chahul On Voot.com

१४. दर्शन

Darshan Marathi Serial
Darshan

दर्शन हि सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री  ६.३० वाजता प्रसारित होते.
हि सिरियल अलका कुबल वर आधारित आहे. या सिरीयल मध्ये आपल्याला नवनवीन देवांचे दर्शन घरी बसल्या होते.
या सिरियल मध्ये लोकांमध्ये देवामुळे कोणकोणत्या गोष्टीत बदल झाले आणि काय काय चमत्कार देवाने केले हे पाहण्यासाठी नक्की पहा दर्शन….

पात्र

अलका कुबल

Watch Darshan On Voot.com

१५. गणपती बाप्पा मोरया

Ganapati Bappa Moraya Marathi Serial
Ganapati Bappa Moraya

गणपती बाप्पा मोरया हि सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर प्रसारित होते. हि सिरीयल शिव पार्वती पुत्र गणेशा वर आधारित आहे. या सिरीयल मध्ये गणेशचा जन्म कसा झाला आणि त्याने लहान असतानाच काय काय चमत्कार केले हे या सिरीयल मध्ये पाहायला मिळते. गणेशाने कशी त्याच्या प्रजेची देखभाल केली हे पाहण्यासाठी नक्की पहा गणपती बाप्पा मोरया…..

पात्र

स्वराज येवले- श्री गणेश

Watch Ganpati Bappa Morya On Voot.com

 

१६. तूच माझा सांगाती

Tuch Maza Sangati Marathi Serial
Tuch Maza Sangati

तूच माझा सांगती हि सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर प्रसारित होते. हि सिरीयल पूर्णपणे देवाशी निघडीत आहे.
या सिरीयल मध्ये तुकाराम महाराजांच्या जीवनाविषयी दाखवले आहे आणि हि सिरीयल तुकाराम आणि आवलीवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये तुकारामांना देवाची भक्ती करताना किती लिकांनी त्रास दिला आणि तो कसा दिला हे पाहण्यासाठी तुम्हाला तूच माझा सांगाती हि शरीरयल पाहावी लागेल …..

पात्र

चिन्मय मांडलेकर- संत तुकाराम
मृन्मयी सुपाळ- आवली

Watch Tuch Maza Sangati On Voot.com 

१७. असं सासर सुरेख बाई

Asa Saasar Surekh Bai Marathi Serial
Asa Saasar Surekh Bai

असं सासर सुरेख बाई हि सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल जुई आणि यश या दोघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये जुई हि खूप मोठ्या घरची मुलगी आहे आणि यश हा अत्यंत सामान्य घरातील मुलगा आहे. या सिरीयल मध्ये जुई आणि यश हे एकाच ऑफिस मध्ये काम करत असतात. त्यांचं मग प्रेम होत आणि नंतर लग्न पण होत. जुई हि श्रीमंत घरातील मुलगी असल्यामुळे तिला लग्न झाल्यावर सगळ्यांशी जुळून घ्यायला तिला काय अडचणी येतात आणि ती त्यांना कशी सामोरे जाते हे पाहण्यासाठी नक्की पहा असा सासर सुरेख बाई……

पात्र

संतोष जुवेकर- यश
मृणाल दुसानिस- जुई

Watch Asa Saasar Surekh Bai On Voot.com

१८. माझ्या नवऱ्याची बायको

Mazya Navryachi Bayko Marathi Serial
Mazya Navryachi Bayko

माझ्या नवऱ्याची बायको हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री  ६ वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल राधिका, शनाया आणि गुरुनाथ या तिघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये राधिका आणि गुरुनाथ पती पत्नी आहेत. गुरुनाथचे लग्नाबाहेर शनाया सोबत अफेर आहे.राधिका गुरुनाथला आणि तिच्या संसाराला शनाया पासून
कशी वाचवते हे पाहण्यासाठी नक्की पहा माझ्या नवऱ्याची बायको…..

पात्र

अभिजित खांडकेकर- गुरुनाथ
अनिता दाते- राधिका
रसिका सुनिल- शनाया

Watch MAzya Navryachi Bayko On ozee.com

१९. खुलता कळी खुलेना

Khulata Kali Khulena Marathi Serial
Khulata Kali Khulena

खुलता कळी खुलेना हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल विक्रांत, मानसी आणि मोनिका या तिघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये विक्रांत आणि मोनिकाच्या लग्न झाले आहे आणि मानसी हि मोनिकाच्या बहीण आहे. मानसी आणि विक्रांत एकमेकांवर प्रेम करतात हे मोनिकाला माहित झाले आहे. ती काय काय प्रयत्न करते त्यांना वेगळं करण्यासाठी हे पाहण्यासाठी नक्की पहा खुलता कळी खुलेना….

पात्र

ओमप्रकाश शिंदे- विक्रांत
मयुरी देशमुख- मानसी
अभिज्ञा भावे- मोनिका

Watch Khulta Kali Khulena On ozee.com

२०. अस्मिता

Asmita Marathi Serial
Asmita

अस्मिता हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता प्रसारित होते. हि सिरीयल
अस्मिता वर आधारित आहे. अस्मिता हि एक डिटेक्टिव्ह आहे. तिच्याबरोबर मनाली आणि सिद हे दोघेही असतात.
प्रत्येक एपिसोड मध्ये गुन्ह्याचा शोध लावते. जर तुम्हाला डिटेक्टिव्ह सिरियल्स आवडत असतील तर अस्मिता हि सिरीयल नक्की बघा…..

पात्र

मयुरी वाघ- अस्मिता
काव्या माने- मनाली
योगेश सोहोनी- सिद

Watch Asmita Now On Ozee.com

२१. दिल दोस्ती दुनियादारी

Dil Dosti Duniyadari Marathi Serial
Dil Dosti Duniyadari

दिल दोस्ती दुनियादारी हि सिरीयल झी मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल कैवल्य,सुरज, आशु,अना आणि मिनू यांच्यावर आधारित आहे. हि सिरीयल पूर्णपणे कॉमिडी आहे आणि
या सिरीयल मध्ये कैवल्य हा एक रॉकस्टार आहे. कैवल्य आणि अना ची प्रेम कहाणी पण दिसून येते. यानाच्या या प्रेमकहाणीचा आणि कैवल्यच्या जीवनाचे पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी पहा दिल दोस्ती दुनियादारी

पात्र

अमेय वाघ- कैवल्य काटकर
सुव्रत जोशी- सुरज ठाकूर
पुष्कराज चिरपुटकर- आशु
पूजा ठोंबरे- अना
स्वानंदी टिकेकर- मिनू

Watch Dil Dosti Duniyadari On ozee.com 

२२. कमला

Kamala Marathi Serial
Kamala

कमला हि सिरीयल एटीव्ह मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल देव, शरयू आणि कमला या तिघांवर आधारित आहे. देव हा एक पत्रकार आहे शरयू हि त्याची बायको आहे
आणि कमला हि त्याने आदिवासी लोकांकडून कळा धागा बांधून आणलेली मुलगी आहे. देव हा कमला आणि शरयू चा कसा उपयोग करून घेतो आणि त्या दोघीना त्याच्या तालावर कसा नाचवत असतो हे पाहण्यासाठी नक्की पहा कमला

पात्र

अक्षर कोठरी- देवाशिष देशपांडे
दीप्ती केतकर- शरयू
अश्विनी कासार- कमला

Watch Kamala On Voot.com

२३. स्वप्नांच्या पलीकडले

Swapnanchya Palikadle Marathi Serial
Swapnanchya Palikadle

स्वप्नांच्या पलीकडले हि सिरीयल स्टार प्रवाह या चॅनल वर सोमवार ते शनिवार ८ वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल शेयस आणि वैदही या दोघांवर आधारित आहे. या सिरीयल मध्ये शेयस हा विधी वर एकतर्फे प्रेम करत असतो आणि तो विधीला मिळवण्यासाठी काय- काय करतो आणि लग्नानंतर विधीला कोणकोणत्या गोष्टीना सामोरे जावे लागते हे पाहण्यासाठी नक्की पहा स्वप्नांच्या पलीकडे…..

पात्र

चिन्मय उदगीरकर- शेयस
गौरी नलवडे- वैदही

२४. गंध फुलांचा गेला सांगून

Gandh Phulancha Gela Sangun Marathi Serial
Gandh Phulancha Gela Sangun

गंध फुलांचा गेला सांगून हि सिरीयल एटीव्ह मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल विश्वनाथ आणि महिमा या दोघांवर आधारित आहे. विश्वनाथ हा सगळ्यात मोठ्या घरातील आहे आणि महिमा हि आदिवासी पाड्यातील आहे. त्या दोघांची प्रेम कहाणी आणि त्या दोघांना येणाऱ्या अडचणी आणि माहीमला लग्नांतात येणारे प्रॉब्लम. यांना ती कशी तोंड देते हे पाहण्यासाठी नक्की पहा गंध फुलांचा गेला सांगून…

पात्र

आशुतोष कुलकर्णी- विश्वनाथ जेधे
धनश्री काडगावकर- माहीमा

२५.किती सांगायचंय मला

Kiti Sangaychy Mala Marathi Serial
Kiti Sangaychy Mala

किती सांगायचंय मला हि सिरीयल कलर्स मराठी या चॅनल वर सोमवार ते शनिवार रात्री ७ वाजता प्रसारित होते.
हि सिरीयल ओम आणि अर्पिता या दोघांवर आधारित आहे. या  सिरियल मध्ये अर्पिता आणि ओम ची प्रेम कहाणी आहे.
या मालिकेत महत्वाची भूमिका नुपूर परुळेकर आणि आशय कुलकर्णी पाहण्यासारखी आहे. अर्पिता हि कलेक्टर आहे तिचे लग्न ओम सोबत आहे झाले. तिला लग्नानंतर घर आणि तिचे ऑफिस हे ती कसे सांभाळते हे पाहण्यासाठी नक्की पहा किती सांगायचंय मला

पात्र

आशय कुलकर्णी- ओम
नुपूर परुळेकर- अर्पिता पाटकर

Watch Kiti Sangaychy Mala On Voot.com

Comments

Leave a Comment